महिपाळगड येथील शिवराज विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2026

महिपाळगड येथील शिवराज विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त वृक्षारोपण

महिपाळगड : येथे शिवराज विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा वृक्षारोपणाने प्रारंभ करतांना मान्यवर

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

महिपाळगड (तालुका चंदगड) येथील भवानीमाता शिक्षण प्रसारक मंडळ,  संचलित शिवराज विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. रमेश भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी स्टील (शिनोळी) चे उद्योजक उदय शंकरराव घोरपडे उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलताना उदय घोरपडे यांनी ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीसाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करताना बदलत्या हवामानाचे संकट लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. रमेश भोसले यांनी ३० वर्षांपूर्वीची गावाची शैक्षणिक परिस्थिती आणि मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांच्या तीव्र इच्छेतून स्थापन झालेल्या विद्यालयाचा आढावा घेतला. रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून  मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपाची लागवड करण्यात आली.

यावेळी गावच्या सरपंच रेणुका सुतार, उपसरपंच अशोक कदम, चारुशीला भोसले, व्यापारी भाऊराव मोरे यांसह संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील सावंत यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केले, तर आभार पांडुरंग मलतवाडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवंत पुजारी, शरद पाटील, योगेश मोरे, पुंडलिक भोसले, महेश कांबळे, वैजनाथ तुपारे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment