तावरेवाडी येथील इस्त्राईल स्थित इंजिनीयर केशव आवडण यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2026

तावरेवाडी येथील इस्त्राईल स्थित इंजिनीयर केशव आवडण यांना पितृशोक

 

विष्णू उर्फ बाळू भरमू आवडण

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        तावरेवाडी (ता. चंदगड) येथील भारतीय सैन्य दलाचे निवृत्त हवालदार, माजी उपसरपंच विष्णू उर्फ बाळू भरमू आवडण (वय - ७०) यांचे शुक्रवारी दि. ३ जुलै २०२६ रोजी बेळगाव येथे दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय सैन्य दलाचे निवृत्त मेजर सुभेदार लक्ष्मण भरमू आवडण यांचे ते बंधू तर इस्त्राईल येथील मेकॅनिकल इंजिनियर केशव आवडण यांचे ते वडील होत. १९७१ च्या युद्धामध्ये सहभाग असणारे दिवंगत जवान भरमू मुकुंद आवडण यांचे ते चिरंजीव होत. रक्षाविसर्जन सोमवारी दि. ६ रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

No comments:

Post a Comment