चंदगड : प्रतिनिधी
“शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन नगरसेवक श्री. सुधीर पिळणकर यांनी केले.
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे आयोजित इको-फ्रेंडली गणपती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील म्हणाले, “अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रम राबविणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.”
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी माती, शाडू, कागदाचा लगदा तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केला. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ६२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आकर्षक, सुबक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
स्पर्धेच्या मोठ्या गटात
संभव कुंभार याने प्रथम, शुभम कुंभार याने द्वितीय, निखिल पोखळे याने तृतीय, तर गंधर्व कुंभार व वरद तोरसकर यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.
लहान गटात
अशितोष कुंभार याने प्रथम, शिवतेज कुंभार याने द्वितीय, पूर्वा कुंभार हिने तृतीय, तर श्रेयस लोदुरकर व विजय कोरी यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळविला.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. व्ही. बी. गावडे, प्रा. मनोहर गावडे व प्रा. कविता खोत यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन ओंकार पाटील, आकाश चव्हाण व शरद हदगल यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य टी. एस. चांदेकर, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. जी. साबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘गणरायाचे स्वागत करूया; पर्यावरणही जपूया’ हा संदेश दिल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.

No comments:
Post a Comment