कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचा १३ वा वर्धापन दिन बँकेच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. बँकेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शिवाजी रेडेकर व विजय पवार यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
या प्रसंगी बँकेचे अधिकारी व कर्मचारी राघवेंद्र कलूर, चाळू पाटील, अस्मिता नाईक, महादेव बामणे या स्टाफसह ग्राहक सभासद शंकर कोरी, सी. बी. निर्मळकर, रमेश कुंभार, सौ रंजना पाटील, सौ दीपाली मुक्कनावर, सौ नम्रता पाटील, सौ स्नेहल कुरणे व बँकेशी संलग्न इ- सेवाकेंद्राचे संचालक रवी कुंभार, बचत गटाच्या महिला व बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्टेंबर २०१३ ते २०२३ या १३ वर्षांच्या काळात संस्थेने ५० कोटींच्या व्यवहाराचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती यावेळी शाखाधिकारी जाधव यांनी दिली. परिसरातील ग्राहकांनी बँकेच्या विविध सेवा सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन करताना यापुढेही बँक व बँकेतील सर्व कर्मचारी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी तत्पर व कटिबद्ध राहतील अशी ग्वाही दिली. शेवटी शंकर कोरी यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment