ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दयानंद मोटुरे यांची बिनविरोध निवड - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2026

ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दयानंद मोटुरे यांची बिनविरोध निवड

 


कोवाड : सी.एल. वृत्तसेवा

    कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दयानंद मोटुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान ही निवड पार पडली.

या निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. शिंदी यांनी पाहिले. यावेळी सुकाणू कमिटीचे के. आर. किरूळकर, राजेंद्र भोजे, जयसिंग बिडकर, एस. डी. पाटील, सागर सरावने, इंगळे, श्रीधर भोगणं आणि सरदार दिंडे यांच्यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते.

यावेळी साताप्पा कांबळे, संदीप चौगुले, विनोद पाटील, संजय सावेकर, उदय पानारी, दीपक कांबळे, संदीप धनवडे, सौ. माधुरी साळुंखे, सौ. सारिका बंडगर, जयकिशन कांबळे, दीपक पाटील, रावसाहेब कोळी, जी. एल. पाटील आणि शिवाजी कोल्हे आदी उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर रमेश पाटील यांनी सचिव म्हणून निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित चेअरमन दयानंद मोटुरे यांनी मनोगत व्यक्त करताना, संस्थेच्या सर्व सभासद व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment