जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजचे यश, रवळनाथ कनबरकरची ग्रीको-रोमन कुस्तीत द्वितीय क्रमांकाची बाजी - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2026

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजचे यश, रवळनाथ कनबरकरची ग्रीको-रोमन कुस्तीत द्वितीय क्रमांकाची बाजी

 

रवळनाथ कनबरकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    शाहूवाडी (तुरुकवाडी) येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगडच्या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

    १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी रवळनाथ श्रीधर कनबरकर याने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

    रवळनाथच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन अॅड. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर तसेच पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशासाठी रवळनाथला क्रीडा शिक्षक प्रा. एन. डी. हदगल व टी. व्ही. खंदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment