चंदगड : प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघातील दळणवळण, आरोग्य व रोजगाराशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. प्रमोदजी सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कोलिकमार्गे कणकुंबी ते गोवा रस्ता या मार्गाच्या विकासाचा प्रश्न, तसेच वास्को–पणजी–चंदगड–गडहिंग्लज–आजरा मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. या बससेवेमुळे गोवा व चंदगडसह सीमाभागातील नागरिकांच्या दळणवळणाला मोठी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गोव्यात वास्तव्यास असलेल्या चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील पात्र कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा व विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबतही मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातील स्थानिक युवकांना गोव्यातील विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
या सर्व विषयांवर मुख्यमंत्री मा. प्रमोदजी सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्नांबाबत सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळण, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:
Post a Comment