सत्य, अहिंसा आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा : योगीता पाटील, दि इंग्लिश स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2026

सत्य, अहिंसा आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा : योगीता पाटील, दि इंग्लिश स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज, चंदगड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

“जगाला जिंकण्यासाठी शस्त्रांची नव्हे, तर सत्य, अहिंसा आणि प्रेमाची गरज असते. गांधीजींच्या विचारांतच राष्ट्रभक्तीचे बीज आहे. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, कर्तव्यनिष्ठा, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये आजच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या योगिता पाटील यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ‘गांधी विचार आणि समाज’ या विषयावर गांधीजींच्या विचारांचा आजच्या सामाजिक जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट केला. स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, साधेपणा, स्वावलंबन, सत्य आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा ही शास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. प्रारंभी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए डी. धायगुडे यांनी प्रास्ताविक केले .

उपप्राचार्य टी. एस. चांदेकर यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार प्रा. एस व्ही बेनके यांनी मानले.

कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, प्रा. एस. ए. शेख, प्रा. डी. व्ही.शिंदे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment