ईनाम सावर्डे येथे बळीराजा शेत पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन; शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2026

ईनाम सावर्डे येथे बळीराजा शेत पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन; शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार



चंदगड : सी एल वृत्तसेवा

ईनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे बळीराजा शेत पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्या-येण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाणंद रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. शेतीच्या दैनंदिन कामांसह शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होऊन कृषी विकासाला चालना मिळणार आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, शांतारामबापू पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे, चंदगड नगराध्यक्ष सुनील काणेकर, संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षा भारतीताई जाधव, संग्रामसिंह आडकुरकर, सुरेश हारेर, विशाल बल्लाळ, दिग्विजय देसाई, राम पाटील, सुरेश सातवणेकर, सुनील पाष्टे, उद्योजक लक्ष्मण गावडे, परेश पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment