![]() |
चंदगड येथील कन्या शाळेत गोवर व रुबेला लसीकरण कार्यक्रमावेळी बोलताना जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, बीडीओ श्री. जोशी, आ. अ. अनिल गळवी, पं. स. सदस्य श्री. काणेकर, डाॅ. मकानदार. |
चंदगड / अडकूर / कोवाड / प्रतिनिधी
गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन
करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत
आजपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ९ महिने ते १५ वर्षांखालील राज्यातील
सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग
कार्यरत झाला आहे. या अंतर्गत चंदगड आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील विविध
शाळांच्यामध्ये गोवर आणि रुबेला लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला.
चंदगड येथील कन्या प्राथमिक
शाळेत गोवर रूबेला मुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत गोवर-रूबेला
लसीकरण झाले. जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी लसीकरणासाठी आरोग्य सेविका
अंगणवाडी सेविका यांनी परीक्षण घेऊन हे लसीकरण अभियान यशस्वी केल्याबद्दल
गौरवोद्गार काढले. पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांनीही लसीकरणाचा करण्याचा
उद्देश स्पष्ट करताना आपला देश निरोगी असल्या पाहिजे. भावी पिढी सदृढ असावी म्हणून
लसीकरणाची आवश्यकता आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या
प्रयत्नांची कौतुक केले. तालुका आरोग्य अधिकारी अनिल गवळी यांनी लसीकरणाची मोहीम
यशस्वी करण्यासाठी आमचा आरोग्य विभाग दक्षतेने काम करत असल्याचे सांगून
तालुक्यातील सर्व शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम पार पाडली जात असल्याचे सांगितले. गटविकास
अधिकारी रमेश जोशी यांनीही या अभियानाचे महत्व विशद केले. यावेळी मुख्याध्यापक, चंदगड
ग्रामीण रुग्णांलयातील कर्मचारी, कन्या शाळा मधील सर्व शिक्षक व शिक्षिका, पालक
वर्ग उपस्थित होता. लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र
देण्यात आले. आभार आरोग्य विस्तार अधिकारी ए. पी. गजगेश्वर यांनी मानले.
![]() |
अडकूर (ता. चंदगड) येथील हायस्कूलमध्ये गोवर रुबेला लसिकरण शुभारंभ करताना सभापती बबनराव देसाई, अभय देसाई, सरपंच यशोधा कांबळे, डॉ. सोमजाळ आदी. |
अडकूर (ता. चंदगड) येथे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व
प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर यांच्या वतीने श्री शिवशक्ती हायस्कूल येथे विद्यार्थांना गोवर आणि रुबेला लसिकरण करण्यात आले. चंदगड पंचायत समितीचे
सभापती बबनराव देसाई यांच्या हस्ते या मोहिमेची सुरवात झाली. दिपप्रज्वलन सरपंच
श्रोमती यशोधा कांबळे, प्राचार्य डी. जी. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अभयबाबा
देसाई, वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, पर्यवेक्षक एस. जी. पाटील
यांच्या हस्ते झाले. शासनाने चालू केलेल्या या लसिकरण मोहिमेचा लाभ सर्व
विद्यार्थानी घ्यावा. याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. गोवर रुबेलाच्या समूळ
उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन सभापती श्री. देसाई यांनी केले.
वैद्यकिय अधिकारी डॉ़. सोमजाळ यांनी लसिकरणाचे महत्व स्पष्ट केले. हायस्कूलमधील
350 विद्यार्थाना लसिकरण करण्यात आले. या मोहिमेत आरोग्य सेवक अभिजित काटकर, आरोग्य
सेविका संपदा नाईक, परिचर अशोक बुधवंत, अंजना
लोहार, आरोग्य सेविका एस. डी. नाईक, आशा सुनिता घोरपडे, शोभा
नाईक, प्रिती भावणकर, आर. व्ही. देसाई, एस.
के. पाटील, आर. पी. पाटील, पी.
के. पाटील, एस. के. हरेर आदिसह विद्यार्थी उपस्थित होते.
![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयात गोवर व रुबेला लसीकरणाला प्रारंभ झाला. |
No comments:
Post a Comment