माडखोलकर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2018

माडखोलकर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन



चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्यावतीने 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी दिली.
स्पर्धेसाठी 100 रुपये प्रवेश शुल्क आहे. स्पर्धेसाठी माडखोलकर सर शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ, महिला सबलीकरण आभास की वास्तव, कर्जमाफी- कशासाठी, कुणासाठी, समाज परिवर्तनातील प्रसार माध्यमांची भुमिका, वसुंधरा वाचवा प्रदुषणाचा विळख्यातून, निकोप लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, चंदगड तालुका पर्यटकांचे नंदनवन हे विषय ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 4 हजार, द्वितीय 3 हजार, तृतीय क्रमांक 2 हजार व उत्तेजनार्थ 1 हजार व स्मृतीचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धकांजवळ आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे माध्यम मराठी असेल. इच्छुक स्पर्धकांनी प्रा. एल. एन. गायकवाड (9421926634), प्रा. सौ. एस. बी. दिवेकर (9422279537), प्रा. एस. एन. पाटील (9421112995) यांचेशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment