बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2018

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या सायली वर्पे हिला बक्षिस वितरण करताना मान्यवर.
चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे हिंदू ह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणार्थ भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये मोठ्या गटात रोहन आदमापुरे व लहान गटात शुभांगी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण प्रसारक मंडळचे चेअरमन डॉ. पी. जी. बांदिवडेकर होते.
मोठ्या गटामध्ये प्रियांका कांबळे हिने द्वीतीय, विद्या कांबळे हिने तृतीय, सरीता देसाई हिने चतुर्थ व हौसेराव उबाळे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. लहान गटामध्ये सायली वर्पे हिने द्वीतीय, श्रेयस दोडण्णावर हिने तृतीय, रोशनी देवण हिने चतुर्थ तर समर्थ बेदुरे याने पाचवा क्रमांक पटकावला. विजेत्यांना शिवसेना चंदगड विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल शिंत्रे, ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व शिवसेना नेते रियाजभाई शमनजी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, माडवळे गावचे सरपंच गंगाधर गावडे, कारवे ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग बेनके,तुर्केवाडी ग्रामपंचायत सदस्य भरमाण्णा अडकूरकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. यावेळी तानाजी चौगुले, चेतन बांदिवडेकर, प्रियंका कांबळे, फातिमा मुल्ला, ग्रामपंचायत तलाठी श्री. ठोसर, पोलीस पाटील माधुरी कांबळे,  तुर्केवाडी सेवा संस्थेचे चेअरमन लक्ष्मण खोत, संचालक रामचंद्र अष्टेकर, व्ही आर गावडे, प्रा. आर. के. शिंदे, महादेव गावडे, कौशल बांदिवडेकर, महेंद्र गावडे, साईअरूण चौगुले, माऊली साऊंडचे तुषार गावडे उपस्थित होते. सुत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले. आभार शिवसेना उपतालुकाप्रमुख व विद्यमान शहरप्रमुख प्रल्हाद चौगुले यांनी मानले.



No comments:

Post a Comment