तालुक्यात ठिकठिकाणी संविधान दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2018

तालुक्यात ठिकठिकाणी संविधान दिन उत्साहात साजरा



चंदगड / प्रतिनिधी
बागीलगे-डुक्‍करवाडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, म. फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन ज्येष्ठ शिक्षक एस. एस. तुर्केवाडकर, ए. एन. पाटील, पी. ए. मधाळे, एन. के. कित्तुर, ए. डी. सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संविधान दिनाच्या संबंधाने पी. एस. मगदूम व ए. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. संविधान सप्ताहानिमित्ताने विविध उपक्रम याची माहिती विदयार्थ्यांना देण्यात आली.
विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक पी. एस. मगदूम यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या "भारताचे संविधान" या भिंती पत्रकाचे उद्घाटन ज्येष्ठ अध्यापिका जे. एम. मजुकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातून संविधान रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात संविधानाचा जयजयकार करत या रॅलीमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. मगदूम यांनी तर आभार पी. ए. मधाळे यांनी मानले. याप्रसंगी ए. बी. नाईकवाडी, पी. एन. गावडे, टी. व्ही. पाटील, श्रीमती व्ही. एन. मुंगारे, के. आर. गावडे, पी. जे. बोकडे, श्रीमती व्ही. जे. कालकुंद्रीकर आदीसह शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
नांदवडे (ता. चंदगड) येथील श्री. भावेश्वरी विद्यालयात मुख्याध्यापक आर. आय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. प्रमुख वक्ते म्हणून पी. एम. कांबळे होते. प्रारंभी कु. सुप्रिया पाटील हिने भारतीय संविधानाचे वाचन केले. प्रमुख वक्ते पी. एम. कांबळे यांनी भारतीय संविधानाचा सखोल आढावा घेतला. मुख्याध्यापक आर. आय. पाटील यांनी भारतीय संविधान हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाऱ्या सर्व नागरिकांच्यासाठी आहे. पण काही शक्ती नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करून संविधानात अडथळे निर्माण करत असल्याचे सांगितले. याच संविधान दिनी मुंबई येथे १० वर्षापूर्वी २६ नोव्हेंबर २००८ राजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यानी १० ठिकाणी एकत्रित हल्ले करून १९७ नागरिकांना ठार केले. त्यांना श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन सौ. एस. आर. कोरवी यांनी केले. आभार डी. एस. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment