शिवसेना सीमाभागातील बांधवांबरोबर सदैव पाठीशी -उपजिल्हाप्रमुख प्रभाकरदादा खांडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2018

शिवसेना सीमाभागातील बांधवांबरोबर सदैव पाठीशी -उपजिल्हाप्रमुख प्रभाकरदादा खांडेकर

बिजगर्णी येथे मुख्याध्यापक बेळगावकर यांच्या सत्कार करताना शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर

चंदगड / प्रतिनिधी
सीमाभागातील ८६५  खेडी महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु ढोंगी राजकीय नाकर्तेपणामुळे सीमाभागातील मराठी बांधवांची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून महाराष्ट्रातील  शिवसेना व  पदाधिकारी,कार्यकर्ते मराठी बांधवांच्या सदैव पाठीशी असल्याचे मनोगत बिजगर्णी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेमध्ये गेली तीस वर्षे सेवा करणार्‍या मुख्याध्यापक पी. पी. बेळगावकर यांच्या सेवानिवृत्त सत्कार समारंभाप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी व्यक्त केले.
पी. पी. बेळगावकर सरांनी ज्या- ज्या गावांमध्ये शिक्षणाची धुरा सांभाळली त्या गावांमध्ये शिक्षणाबरोबरच इतर सामाजिक उपक्रमांमध्येसुध्दा आपला ठसा उमटविला. एवढ्यावरच न थांबता सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सहकार्य  केले त्यांच्या अष्टपैलू कामामुळे  नावलौकिकाला साजेसा असा एक चाहतावर्ग निर्माण झाला. त्याची प्रचिती आज  याठिकाणी दिसुन येते. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सरांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपला वेळ द्यावा अशी आशा खांडेकर यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे नियोजन ब्रम्हलिंग सेवा सोसायटी व तिरंगा युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष परशराम भाष्कळ, अशोक कांबळे, ॲड. नामदेव मोरे, अजितदादा खांडेकर , यल्लाप्पा बेळगावकर, बबन जाधव, प्रकाश भाष्कळ, मनोहर पाटील रविंद्र हलकणर्णीकर, कल्लाप्पा भाष्कळ, दिपक कांबळे, रतन सुतार, परशराम बेर्डे , निर्मला बेळगावकर, रिता बेळगावकर, सुधा अष्टेकर, लक्ष्मी पाटील आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment