![]() |
हलकर्णी (ता चंदगड) येथे ग्रामस्थांच्या वतीने राजेश पाटील यांचा सत्कार करताना सरपंच एकनाथ कांबळे, जि. प. सदस्य श्री. सुतार व इतर. |
हलकर्णी / प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात एखादे पद मिळणे म्हणजे हे जबाबदारीचे काम आहे. माझे वडील
कै. नरसिंगराव पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचा व दौलतचा विचार केला.
त्याच्या पुण्याईने व तालुक्यातील जनतेच्या आर्शिवादामुळेच मला कोल्हापुर जिल्हा
मध्यवर्ती बँकेचे सचांलक पद व तालुका खरेदी -विक्री संघाला सहकारात उत्कृष्ट
कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार मिळऊ शकला' असे प्रतिपादन तालुका संघाचे अध्यक्ष राजेश
पाटील यांनी केले. कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सचांलक म्हणुन निवड
झाल्याबद्द्ल हलकर्णी (ता. चंदगड) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार, हलकर्णीचे सरपंच एकनाथ काबंळे, माजी जि.प. सदस्य शिवाजीराव सावंत
तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक मच्छिंद पाटील यांनी केले.
राजेश पाटील म्हणाले, " प्रत्येक ठिकाणी सत्कारसाठी गेल्यानंतर
आपण तालुका संघ योग्यरित्या चालवला आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातुन
दौलतकडे लक्ष घाला. त्याबाबत संघाच्या सचालकांच्या बरोबर माझी चर्चा झाली आहे.
दौलत बाबत तालुक्यातील सर्व जनतेने साथ दिल्यास लवकरच निर्णय घेतला जाईल असेही
सांगितले. गावठाण मधुन जाणारा रस्ता मंजुर केल्याबददल जि.प. सदस्य आरुण सुतार
यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, " माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तिवर
राजेश पाटील साहेबांनी दाखवलेल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. माझ्या
जि.प.मतदार संघात जेवढा निधि आणता येईल तितका जास्त निधि आणन्याचा प्रयत्न करणार
असल्याचे त्यांनी सागितले. यावेळी पोलिस पाटील अकुश गुरव, माजी सरपंच अनिल पाटील, सेवा सोसायटी अध्यक्ष राहुल गावडे, गेणाप्पा नाईक, मधुकर सावंत, सुरेश केसरकर, विष्णु मोरे, सुरेश भातकांडे, सुरेश गायकवाड, ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ
मोठया सख्येनें उपस्थित होते. सुत्रसचांलण श्री. मोटुरे यांनी केले तर आभार गोपाळ
आवडण यांनी मांडले.
No comments:
Post a Comment