ग्रामपंचायतीने दारू दुकानांना परवानगी देऊ नये, ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2018

ग्रामपंचायतीने दारू दुकानांना परवानगी देऊ नये, ग्रामस्थांची मागणी

हलकर्णी ( ता. चंदगड ) गावच्या हद्दीत नवीन देशी दारु दुकाने सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी मिळविण्यासाठी कांहींच्या  हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थानी दारू दुकानाना परवाना देऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे निवेदनातून केली आहे. सरपंच श्री. एकनाथ कांबळे यांना निवेदन देऊन ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे. 
जिल्हाधिकाऱ्यानाही निवेदन देऊन दारु दुकानाला विरोध करणार असल्याचे ग्रामस्थानी ठरविले आहे. 
निवेदनात असे म्हटले आहे,  गावच्या विकासात्मक बाबीवर चर्चा होणे अपेक्षीत असताना दारू दुकानाच्या परवान्याबात गावात जोरदार चर्चा रंगली आहे. ही बाब चिंताजनक आहे. येथील कांही दारू दुकाने कॉलेज रोडवर हस्तांतरीत केली आहेत. त्याचा शेजारी असलेल्या महाविद्यालयातील युवक व युतीना  त्रास होत आहे. याची सर्वाना कल्पना असताना पुन्हा या परिसरात दारु दुकाने सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाळांच्या प्रगतीकडे ग्रामस्थांच्यासह ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. गावात दारू विक्री बंद असल्याने एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. असे असताना पिढ्यान पिढ्या बरबाद करणाऱ्या दारूला ग्रामस्थांचा विरोध असताना दारु दुकानाला परवानगी देऊन नेमके काय साध्य केले जाणार  आहे. असा प्रश्न उपस्थित करून गावात दारु विक्रीला परवानगी दिली तर या प्रवृत्ती विरुद्ध लढा उभे करु ,असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.निवेदनावर डॉ.नंदकुमार मोरे, रणधीर सुतार, इंद्रजीत मोरे, राहूल गावडा, दिलीप दळवी, दशरथ नाईक, विनायक केसरकर यांच्या सह्या आहेत.