फेटे बांधण्याची कला देतेय सुप्रियाच्या शिक्षणाला आधार - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2018

फेटे बांधण्याची कला देतेय सुप्रियाच्या शिक्षणाला आधार




संपत पाटील, चंदगड
माणसाने कलेच्या जोरावर आजवर आपले वेगळेपण समाजामध्ये सिध्द केले आहे. कोणतीही कला मनापासून जोपासली कि तीचा फायदा स्वत:बरोबर समाजालाही होतो. कलेच्या माध्यमातून आज अनेकांनी मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा, धन-दौलत मिळवलेली उदाहरणं पाहिलेली आहेत. अशीच सीमाभागातील हिंडलगा (ता. जि. बेळगाव) येथे रहाणारी सुप्रिया कुडचीकर हि महाविद्यालयीन विद्यार्थीनी. तीला फेटे बांधण्याची कला जोपासत आहे. फेटे बांधून मिळणाऱ्या पैशातून ती आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे.
सुप्रिया ने शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी सण-समारंभ अशा कार्यक्रमातून लोकांना मजुरीतत्वावर फेटे बांधून पुढील शिक्षण पूर्ण करणेचा व एक अधिकारी होणेचा चंग बांधला आहे. ती सध्या बी. कॉम. च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. आई-वडील तुटपुंज्या मजुरीवर घर चालवत सुप्रियाला कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण दिले. आणि बारावी पास झालेनंतर पुढील शिक्षण थांबविण्याचा सल्ला दिला. पण जिद्दी सुप्रियांने काहीतरी करुन पुढील शिक्षण घेण्याचा चंग बांधला. स्वतः चार पैसे कमवायचे आणि शिक्षण पुर्ण करायचे असा तिचा मनोदय होता. विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांना फेटे बांधले जातात. मग आपण बिनभांडवली हा व्यवसाय करुन शिक्षण पूर्ण करणेची इच्छा तीने आपले मामा शिवाजी संताजी (रा. हलगा) यांचेकडे मांडली. त्यांनीही होकार दिला.  सुप्रिया आज वास्तूशांती, लग्नसमारंभ, राजकीय   इतर कार्यक्रमात भरदास्त राजेशाही फेटा बांधते. मजरे कारवे येथे शिक्षक बॅंकेचे संचालक  शिवाजीराव पाटील यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात भराभर फेटे बांधणारी ही मुलगी शिक्षक संघाचे नेते  राजाराम वरुटे, संभाजीराव बापटमोहन भोसले यांना अचंबीत करुन गेली. तात्काळ या शिक्षक नेतेमंडळीनी कु. सुप्रियाचा सत्कार केला. तीच्या कष्टाला सॅल्यूट केला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.