चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचे दिमाखात उद्घाटन, मान्यवरांनी दिल्या भरभरुन शुभेच्छा - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2018

चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचे दिमाखात उद्घाटन, मान्यवरांनी दिल्या भरभरुन शुभेच्छा

चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचा संगणकाची कळ दाबुन शुभारंभ करताना तहसिलदार शिवाजी शिंदे, शेजारी संपत पाटील, नंदकुमार ढेरे, शहानुर मुल्ला, संतोष सावंत-भोसले

चंदगड
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचा आज दिमाखात शुभारंभ करण्यात आले. चंदगडचे तहसिलदार शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते या पोर्टल चॅनेलचा शुभारंभ संगणकाची कळ दाबून करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू पाटील होते.
प्रारंभी प्रास्ताविक संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांनी पत्रकार संघाच्या कार्याची माहीती दिली. संपत पाटील यांनी पोर्टल चॅनेलचे महत्व व त्याचा फायदा विषद केला. यावेळी पोर्टल चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घेतलेल्या व्हीडीओ स्वरुपातील शुभेच्छा व मुलाखती प्रक्षेपित करण्यात आल्या.
चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे म्हणाले, ``पोर्टल चॅनेलच्या माध्यमातून समाजात चाललेल्या चांगल्या गोष्टींना प्रसिध्दी द्यावी. वाईट गोष्टीवर अंकुश ठेवा. प्रशासन आपल्याला नेहमीच मदत करेल अशी ग्वाही दिली.``
माजी राज्यमंत्री भरमू पाटील म्हणाले, ``पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे काम आजपर्यंत केले आहे. बदलत्या काळात चंदगडसारख्या ग्रामीण भागात पोर्टल चॅनेल निर्माण केले आहे. हि बाब कौतुकास्पद आहे. या चॅनेलच्या माध्यमातून समाजातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याला हातभार लागणार आहे. या चॅनेलची संकल्पना पत्रकार संघाला सुचली. ते संघाचे सर्वजण कौतुकास पात्र आहेत.``
चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील

शिवसेनेचे चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे म्हणाले, ``चंदगडची खरी ओळख हि पर्यटनाच्या माध्यमातून होते. त्यामुळे चंदगड तालुक्यातील पर्यटनाला या चॅनेलच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लजच्या पूर्व भागाला अद्यापही पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शिवसेना हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.``
शिवसेनेचे चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर म्हणाले, ``जग आज झपाट्याने बदलत चालले आहे. या बदलत्या युगात या पोर्टलच्या माध्यमातून चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यात काय घडतय हे जगाला कळणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून चंदगडच्या पत्रकारांनी जग आणखी जवळ आणले आहे. नोकरीसाठी बाहेर देशात असणाऱ्या आपल्या बांधवांना या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या गावात काय घडते हे कळणार आहे.``
ड. संतोष मळविकर यांनी हे पोर्टल प्रलंबित विषयांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे चंदगडमधील छोटीशी देखील बातमी जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. येथील प्रश्न प्रशासनाच्या समोर मांडण्याला हे एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर म्हणाले, ``या पूर्वीच अशी चॅनेल निर्माण व्हायला हवी होती. उशिरा का होईना चंदगड तालुका पत्रकार संघाने या चॅनेलची सुरवात केली आहे. हि कौतुकास्पद बाब आहे. तालुक्यात बंद पडलेली दौलत सुरु करण्यासाठी या चॅनेलचा उपयोग व्हावा.
बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांनी या चॅनेलला शुभेच्छा दिल्या. विनया विष्णु गावडे या विद्यार्थ्यींनीने समाज व पत्रकार याविषयी मनोगते व्यक्त केले.
यावेळी भाजपा प्रदेश सदस्य गोपाळराव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती विठाबाई मुरकुटे, माजी सभापती शांताराम पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, लक्ष्मण गावडे, उद्योजक सुनील काणेकर, शंकर मनवाडकर, मारुती गावडे, तजमुल फनीबंद, महादेव गावडे, जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ गवस, पी. बी. पाटील, सरपंच पाच्छासो काझी, मावळेश्वर कुंभार, गडहिंग्लज शिवसेना प्रमुख दिलीप माने, मराठा क्रांती संघटनेचे विठ्ठल पेडणेकर, अनंत पाटील, विनायक कुंभार, झेविया क्रुझ, गुलजार शेख, वसंत सोनार, संजय चंदगडकर, बापू शिरगांवकर, पी. एन. वाईंगडे, डी. जी. पाटील, सरपंच जुबेर काझी, कमलेश जाधव, विष्णू गावडे, आप्पा फाटक, आशिष कुतिन्हो, बाळु नार्वेकर, नारायण हसबे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार उदयकुमार देशपांडे, नंदकुमार ढेरे, संजय पाटील, श्रीकांत पाटील, छायाचित्रकार संजय पाटील, चेतन शेरेगार, संतोष सावंत-भोसले, शेखर तारळी, शहानुर मुल्ला, निवृत्ती हारकारे, युवराज पाटील, विजय कांबळे, बाबासो मुल्ला, अनिल केसरकर, मारुती पाथरवट व रोहीत धुपदाळे यांनी शुभेच्छा स्विकारल्या. सदानंद पाटील व राजु शिवनगेकर यांनी सुत्रसंचालन केले. पत्रकार संघाचे संतोष सुतार यांनी आभार मानले.


चंदगड लाईव्ह न्युज पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित पत्रकार.