|  | 
| ढेकोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बिबट्याने खालेला कुत्रा. | 
चंदगड
ढेकोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील म्हातारु
कणगुटकर यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केले. सोमवारी रात्री हि घटना घडली. बिबट्या
गावात आल्याने ग्रामस्थांच्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
गेल्या चार पाच
दिवसापासून कुद्रेमानी परिसरात बिबट्याचा वावर होता. काही दिवसांपासून
या बिबट्याच्या मागावर बेळगाव व चंदगड वनिवभागाचे पथक आहे. मात्र बिबट्याचा माग
सापडत नव्हता. गेल्या चार दिवसापासून बिबट्याने अधून-मधून शेळ्याही ठार केल्या
आहेत. पुन्हा सोमवारी कुत्राचा फडशा पाडल्याने वनखात्याने ग्रामस्थांना
सावधानतेच्या सुचना दिल्या आहेत. मंगळवारी वनक्षेत्रपाल एन. एम. धामणकर, अमोल
शिंदे, विश्वनाथ नार्वेकर यांनी भेट देवून बिबट्याचा वावर असल्याची खात्री केली. 
 
 
 
 
 
 
 
