ह्युमन राईट्सचे विभागीय अधिकारी बापू शिरगांवकर यांची विविध पदांवर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2018

ह्युमन राईट्सचे विभागीय अधिकारी बापू शिरगांवकर यांची विविध पदांवर निवड

बापू शिरगांवकर

ल इंडिया ह्युमन राईट्चे विभागीय अधिकारी बापू शिरगांवकर यांना नॅशनल बोर्ड फ कौन्शिलने एकाच वेळी तीन पदे बहाल केली आहेत. ह्युमन राईट्सच्या जिल्हा सचिव पदी, जन अधिकार संघर्ष मोर्चाच्या जिल्हा संघटकपदी तर नॅशनल कौन्शिल आफ न्यूज ड बोर्ड कास्टींगचे सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे.
एकाचवेळी तीन पदांचा सन्मान मिळालेली जिल्हास्तरिय ह्युमन राईट्समधील ही पहिलीच घटना आहे. इंटरनॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ह्युमन राईट्स स्टडीचा डिप्लोमा त्यांनी सप्टेबर 2018 मध्ये पुर्ण केला आहे. यामध्ये त्यांनी ह्युमन राईट्सचा अभ्यास करत आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहून कौन्शीलमध्ये नॅशनल प्रेसिडेंट ड. अन्थनी राजू यांनी शिरगांवकर यांचे नाव जाहीर केले व सदर पदांची नियुक्ती पत्र प्रदान केली.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात असणारे शिरगांवकर हे गेली पाच वर्षे ह्युमन राईट्सचे काम करतात. त्यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेत नॅशनल बोर्ड फ कौन्शिलने त्यांची दखल घेऊन त्यांना एकाच वेळी तीन पदांचा सन्मान दिला आहे. नॅशनल बोर्ड आफ कौन्शिलने दिलेली जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडू अशी ग्वाही यावेळी बापू शिरगांवकर यांनी दिली. सदर नियुक्तीसाठी त्यांना कायदे सल्लागार म्हणून ड. विजय कडूकर, राजू नाईक यांचे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.