दौलत चा निर्णय न लागल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, दौलत कामगारांच्या बैठकीत निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2018

दौलत चा निर्णय न लागल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, दौलत कामगारांच्या बैठकीत निर्णय

हलकर्णी (ता. चंदगड) येथे लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय हात उंचावून घेताना. 

चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड दौलत चा निर्णय न लागल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्या उमेदवारांची गाडी तालुक्यात फिरू देणार नाही. असा निर्णय आज हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे दौलत कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष संतोष मळवीकर यांनी कामगारांना मार्गदर्शन करून जोपर्यत  आपल्या मागण्या आणि दौलतचा तिढा  सुटत नाही. तोपर्यंत रस्त्यावरील लढाई करावी लागणार आहे. आपल्या हक्कासाठी कामगारांनी आता गप्प बसून चालणार नाही. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी जबाबदार घटक म्हणून दौलतबाबत बँकेची बाजू मांडावी. 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला तालुक्यातील नेत्यांनी आपली बाजू मांडावी. तालुक्यातील सर्वच नेत्यांना दौलत बचाव कृती समिती बैठकीचे निमंत्रण देणार आहे. सात डिसेंबरला होणाऱ्या दौलतच्या जमीन लिलावाच्या दिवशी तालुक्यातील कामगारांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करायचे आहे. त्यादिवशी दोन फुट ऊसाचा दांडा हातात घेऊन कारखान्यावर सहकुटुंब हजर राहावे, असे निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. यावेळी प्रदीप पवार, सुरेश भातकांडे, महादेव फाटक, दिलीप कदम, राजेंद्र पाऊसकर, प्रकाश कांबळे, रमेश पाटील, रघुनाथ वाके, सोमनाथ वांद्रे, राहुल कोंडेकर, अनंत गावडे, सूर्यकांत दळवी, अशोक देसाई, आनंदा खवणवाडकर, नामदेव शिंदे, सुरेश पाटील , भरमाणा पाटील, राणबा पाटील आदिसह सर्व कामगार उपस्थित होते. सुरेश भातकांडे यांनी आभार मानले.