ढेकोळीत बिबट्याचा हल्यात शेळी ठार, परिसरात भितीचे वातावरण - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2018

ढेकोळीत बिबट्याचा हल्यात शेळी ठार, परिसरात भितीचे वातावरण

ढेकोळी (ता. चंदगड) येथे सुगीचा हंगामातील कामासाठी सटुप्पा केदारी बाळगुंदकर हे जनावारांना चारण्यासाठी घेवून गेले होते. यावेळी बिबट्याने हल्ला केला. यामध्ये चरणारी शेळी जागीच ठार झाली. रविवारी दुपारी हि घटना घडली. त्यामुळे ढेकोळी व परिसरातील गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी श्री. बाळगुंदकर हे जनावारांना चारण्यासाठी सोडून भात कापणीच्या कामात मग्न होते. यावेळी बिबट्याने हल्ला करुन शेळीला नरडीचा घोट घेतला. यावेळी ओरडण्याचा आवाज आल्याने बघण्यासाठी गेले असता बिबट्या शेळीला खात असल्याचे दिसले. शेतकऱ्यांनी काठ्यांच्या सहाय्याने बिबट्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अंगावर धावून येत होता. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी गोंधळ उडाल्याने बिबट्या जंगलात पसार झाला. काही वेळानंतर बिबट्या पुन्हा शेळीच्या शोधात त्याच ठिकाणी आल्याचे लोकांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. वनविभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा तुडये वनपाल नेताजी धामणकरवनरक्षक एम. एस. कांबळेदीपक कदमएम. आय. सनदी यांनी केला. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरीकांना सावधानतेचा इशारा पाटणेचे वनक्षेत्रपाल एम. एन. परब यांनी दिला आहे.