उत्पादकांनी जास्तीत-जास्त ऊस हेमरसला द्यावा – भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2018

उत्पादकांनी जास्तीत-जास्त ऊस हेमरसला द्यावा – भरत कुंडल

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस (ओलम) साखर कारखान्याकडून गेल्या आठ वर्षात शेतकऱ्यांना गडहिंग्लज विभागासह कर्नाटक राज्यातील कारखान्यापेक्षा उच्चांकी ऊस दर दिला आहे. चालू गळीत हंगामातील ऊसालाही एफआरपी नुसार २९१९ इतका सर्वाधिक दर दिला जाणार असल्याने ऊस उत्पादकांनी हेमरसला अधिकाधिक ऊस पुरवठा करुन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले आहे.
बिझनेस हेड श्री. कुंडल म्हणाले, "ऊस दरासह शेतकरी हीत डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने ऊस दराबाबत कधीही फारकत केली नाही. नेहमी शेतकरी हितालाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी चुकीच्या माहितीवर गैरसमज करुन घेऊ नये. आजपर्यंत दर चांगला दिल्यामुळेचं ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करता आले आहे. ऊसाची वेळेत उचल करण्यासाठी गाळपात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रतिदिन ५००० मे.टन ऊस गाळप यंत्रणा उभे केली आहे. ऊस बिलांसह तोडणी व वाहतूकीची बिलं वेळेत अदा केल्याने प्रत्येक वर्षी तोडणी व वाहतूकीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची चढाओढ असते. यापुढेही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यानी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करावे. असे आवाहन कुंडल यांनी केले.