चंदगड तालुका संघाला `अटल पणन पुरस्कार` जाहीर, सहकारमंत्र्याच्या हस्ते 26 ला मुंंबई येथे होणार वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2018

चंदगड तालुका संघाला `अटल पणन पुरस्कार` जाहीर, सहकारमंत्र्याच्या हस्ते 26 ला मुंंबई येथे होणार वितरण



चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाला सन 2016-17 चा `अटल पणन पुरस्कार`  जाहीर झाला आहे. त्याचे वितरण 26 डिसेंबर 2018 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सहकारमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.
सहकार क्षेत्रामध्ये अटन पणन योजने अंतर्गत नवीन व्यवसाय ज्या संस्थेने सुरु केला आहेत. त्या संस्थांना प्रोत्सोहन देवून स्वावलंबी बनविण्यासाठी व सहकाराचा प्रचार व प्रसार होवून सहकारी संस्था बळकटी करण्यासाठी सरकारच्या वतीने अटल पणन पुरस्कार दिला जातो. चंदगड तालुका संघाने या अटल पणन योजनेमध्ये भाग घेवून सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम केले. त्यामुळे संघाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चंदगड तालुका संघाच्या वतीने ठिकठिकाणी बझार सुरु करुन संघाचे उत्पन्नही वाढवले. त्याचबरोबर तांदुळ व फळे महोत्सवही घेतले आहेत. बझारसाठी लागणारे साहित्य पॅकिंग करण्यासाठी मशिनरी घेतल्या. पत्र्यावळी तयार करण्याची मशीन घेवून त्यापासून पत्रावळी तयार करुन ती बझारमध्ये विक्री केली. यासह अन्य योजना राबवत संस्था बळकट व्हावी, लोकांना रोजगार व उत्तम प्रतीचा माल मिळावा, यासाठी संघाने प्रयत्न केले. त्यामुळे संघाला हा पुरस्कार मिळाला आहे.
                     दोन महिन्यात दुसरा पुरस्कार
चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाला राज्य सरकारचा सहकार क्षेत्रातील मानाचा `सहकार भूषण` पुरस्कार दोन महिन्यापूर्वी मिळाला आहे. मुंबई येथे रंगशारदा सभागृहात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह संचालक मंडळाने तो स्विकारला. संघाने उत्तम तऱ्हेने केलेल्या कार्यामुळे संघाला दुसरा `अटल पणन पुरस्कार` जाहीर झाल्याने संघाची प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरु असल्याचे दिसते.

No comments:

Post a Comment