मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तहसिलसमोर बेमुदत आंदोलन सुरुच - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2018

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तहसिलसमोर बेमुदत आंदोलन सुरुच

चंदगड तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करताना अपंग बांधव.

चंदगड / प्रतिनिधी 
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अपंगाचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट व्हावी. या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर 27 डिसेंबर 2018 पासून बेमुदत सत्याग्रह धरणे सुरू झाले. यांची प्रमुख मागणी अंध, अपंग, अनाथ, विधवा परितक्त्या, निराधार, दुर्धर रोगी यांच्या अत्यावश्यक गरजा पैकी निर्वाहभत्ता, निवारा, वस्त्र, शिक्षण, उपचार, प्रवास, सेवा, रोजगार, सुरक्षा इत्यादी विषयांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळावी. म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असता त्याची कार्यवाही झाली नाही. म्हणून बेमुदत सत्याग्रह धरणे आंदोलन तहसील कार्यालय चंदगड येथे सुरू आहे. आज या आंदोलनाचा  भाग म्हणून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी गृह विभाग कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कायदा सुव्यवस्था विभाग कोल्हापूर, अध्यक्ष राज्य मानवी हक्क आयोग मुंबई, अध्यक्ष राज्य मागासवर्ग आयोग मुंबई, अध्यक्ष राज्य महिला हक्क आयोग मुंबई, राज्यपाल राजभवन मुंबई,  राष्ट्रपती राष्ट्रपति भवन नवी दिल्ली, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रधान सचिव भारत सरकार नवी दिल्ली,  विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र, राज्य सरकार मुंबई, विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र सरकार, मुंबई सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र सरकार सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई, सभापती विधान परिषद, विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष जोतिबा गोरल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment