चतुर्थ श्रेणीमध्ये समविष्ट करण्यासाठी कोतवालांचे कोल्हापूर येथे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2018

चतुर्थ श्रेणीमध्ये समविष्ट करण्यासाठी कोतवालांचे कोल्हापूर येथे आंदोलन

कोल्हापूर येथे मागण्यांसाठी आंदोलन करताना कोतवाल. 

चंदगड / प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थी श्रेणी च्या रक्कम १४९६९ रुपये दरमहा वेतनाचा समितीचा अहवाल मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. यासाठी महाराष्ट्रतील १२६३७ कोतवाल गेल्या 16 दिवसापासून आंदोलन करत आहेत.  या आंदोलनात आता सर्व राज्य तलाठी, मंडळ अधिकारी संघटनेचे सदस्य काल व आज काळ्या फीती लावून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.  दरम्यान राज्य -प्रकल्पदाता प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने कोतवालांच्या बेमुदत आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे निवेदन गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, आशिष कुतिन्हो आदींनी दिले आहे.
कोतवालांच्या आंदोलनाला पाठींब्याचे निवेदन देताना प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी. 





No comments:

Post a Comment