होसूर घाटात गव्याच्या हल्यात संदिप तारीहाळकर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2018

होसूर घाटात गव्याच्या हल्यात संदिप तारीहाळकर जखमी

होसूर (ता. चंदगड) येथील घाटात गव्याच्या हल्यात नुकसानग्रस्त झालेली संदिप तारीहाळकर यांची दुचाकी. 
कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड - बेळगाव रस्त्यावरील होसूर (ता. चंदगड) येथील घाटात गव्याची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाला. संदीप लोकळू तारीहाळकर (वय, ३२ रा. कागणी) असे जखमीचे नांव आहे. दुपारी १२ वाजता ही घटना घडली. 
कोवाड ते बेळगांव या मार्गावर दिवसा व रात्री उशिरापर्यंत लोकांची वर्दळ असते. यामुळे गव्यांची प्रवाशांतून भिती व्यक्त होत आहे. संदीप तारीहाळकर हे आपल्या मोटारसायकल (एम. एच. 09, बी. डब्यु 5061)   वरून कामानिमित्त बेळगांवला निघाले होते. होसूर घाटात गाडी चढतीला आल्यानंतर अतिवाड गावच्या बाजूकडील डोंगरातून पळत रस्त्यावर आलेल्या गव्याची मोटारसायकला धडक बसली. यामध्ये तारीहाळकर हे गाडीवरून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला, पायाला मार लागला व गाडीचेही नुकसान झाले. धडक बसल्यानंतर गावा महिपाळगडच्या डोंगरात सुसाट गेला. जखमी अवस्थेत तारीहाळकर गव्याच्या भितीने रस्त्याकडेच्या झुडपात काहीवेळ बसले होते. या मार्गावर रात्रीच्यावेळी प्रवाशाना अनेक वेळा गव्यांचे दर्शन झाले आहे. पण आता दिवसाही गवे रस्त्यावर येऊ लागल्याने प्रवाशांच्या भीती निर्माण झाली आहे.


No comments:

Post a Comment