चंदगड येथे सीएम चषक अंतर्गत हॉलीबॉल व चित्रकला स्पर्धा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2018

चंदगड येथे सीएम चषक अंतर्गत हॉलीबॉल व चित्रकला स्पर्धा उत्साहात



चंदगड येथे सीएम चषक अंतर्गत हाॅलीबाॅल स्पर्धेतील विजेता सत्य स्पोर्टस् क्लब
नेसरी सोबत राजू पाटील, एस. एम. पाटील, शिवाजी पाटील व इतर.















चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या सीएम चषक हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्यामध्ये सत्य स्पोर्ट क्लब (नेसरी) तर मुलींच्यामध्ये न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण 30 संघांनी भाग घेतला होता.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रत्येक तालुक्यात ग्रामीण खेळाडूंना वाव देण्यासाठी सी. एम. चषक या स्पर्धा आयोजित करुन ग्रामीण भागातील खेळांना उर्जितावस्था देण्याचे काम केले आहे. या सीएच चषक अंतर्गत तालुक्यात आज चंदगड येथील शिवाजी क्रिडांगणावर पासिंग हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे राज्य कार्यकरीणी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज भाजापध्यक्ष तथा नेसरी जि. प. सदस्य अड. हेमंत कोलेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष समीर पिळणकर, उद्योजक सुनिल काणेकर, चंद्रकांत दाणी, चेतन बांदिवडेकर, संदिप नांदवडेकर, भरमू पाटील, आर. के. पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. एन. एस. मासाळ व प्रा. कपिल पाटील यांनी सुत्रसंचालन केले. युवा अध्यक्ष भावकु गुरव यांनी आभार मानले. या स्पर्धेमध्ये मुलांच्यामध्ये द्वीतीय क्रमांक हनुमान स्पोर्ट्रस कार्वे व तृतीय क्रमांक वैकटेश्वर युथ क्लब सुंडी यांनी पटकावला. तर मुलींच्यामध्ये भगतसिंग अकॅडमी हलकर्णी यांनी द्वीतीय क्रमांक व ताम्रपर्णी विद्यालय शिवनगे तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे नियोजन राजू पाटील व योगेश कुडतरकर यांनी केले. न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा आयोजनासाठी मदत केली. पंच म्हणून प्रा. एस. एम. पाटील, प्रा. एन. डी. हदगल, प्रा. पी. एस. सावगावे, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले.
                चित्रकला स्पर्धेला दोन हजार विद्यार्थांची नोंदणी
दरम्यान आज सी. एम. चषक अंतर्गत चित्रकला स्पर्धा चंदगड येथील शिंगटे-माळवे सभागृहात घेण्यात आली. यामध्ये ऑनलाईन पध्दतीने दोन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेला सी. एम. चषक स्पर्धेतील सर्वात जास्त नोंदणी झालेली हि स्पर्धा ठरली.



No comments:

Post a Comment