दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
जिल्हा परिषद कोल्हापुर व पंचायत समिती चंदगड
यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सांस्कृतीक स्पर्धा सोमवार २४ ते बुधवार २६
डिसेंबर 2018 रोजी प्राथमिक शाळा धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे संपन्न होणार
असल्याची माहिती केंद्रप्रमुख यशवंत चौधरी यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
माजी सभापती शांताराम पाटील असतील. सभापती बबनराव देसाई व उपसभापती सौ. विठाबाई
मुरकुटे यांच्या हस्ते या सांस्कृतीक स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जि. प.
सदस्य अरूण सुतार, सौ. विद्या
पाटील, कल्लाप्पा भोगण, सचिन
बल्लाळ, तहसिलदार
शिवाजीराव शिंदे, गटविकास अधिकारी रमेश जोशी यांच्यासह सर्व आजी,
माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी परीसरातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे
आवाहन पंचायत समितीच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment