पाटणे येथे रविवारी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2018

पाटणे येथे रविवारी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम


  
माणगाव / प्रमिनिधी
पाटणे (ता. चंदगड) येथील श्री छत्रपती शहाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था माणगांव संचलित तालुक्यातील 13 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे वार्षिक स्नेहसंम्मेलन, पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन रविवार (ता. 23) रोजी दुपारी 2 वाजता आयोजित केला आङे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष महादेव पाटील असतील. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी संस्थेचे सचिव गोकुळचे संचालक राजेश पाटील, जि. प. सदस्या विद्या पाटील,  पंचाय समिती सदस्य ॲड. अनंत कांबळे, सहसचिव जी. एन. गणाचारी, महादेव प्रसादे परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य पी. एम. टक्केकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment