कोवाड / प्रतिनिधी
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालय व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित केलेल्या ४४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मौजे कारवे, दुंडगे, किणी, मांडेदुर्ग, राजगोळी, सरोळी व चंदगड विद्यालयाने बाजी मारली. प्रदर्शनात १२७ उपकरणांची मांडणी केली होती. तानाजी वाघमारे यांच्या अध्यक्षस्थेखाली समारोप कार्यक्रम झाला. शेतकरी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष मारुती मुंगुर्डेकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले.
गट शिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार, प्राचार्य एस. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनातील निकाल पुढील प्रमाणे : प्राथमिक स्तर विद्यार्थी उपकरण (१ली ते ५वी) - विद्यामंदिर मौजे कारवे (वन्यजीव संरक्षण), मराठी विद्यामंदिर सुंडी (सैर मंडल), खन्नेटी विद्यामंदिर खन्नेटी (न जळणारी झोपडी), प्राथमिक स्तर विद्यार्थी उपकरण (६वी ते ८वी)- दुंडगे माध्यमिक विद्यालय दुंडगे (स्नायू ऊर्जेवर धुलाई मशिन चालवणे), दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड (बायोऑक्सी फरनेस), धनंजय विद्यालय, नागनवाडी (वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण), माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर विद्यार्थी उपकरण (९वी ते १२वी) - महात्माफुले विद्यालय व तुपारे कॉलेज कार्वे (कपडे सुकवण्याचे यंत्र), दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड (शाश्वत ऊर्जा), जनता विद्यालय, तुर्केवाडी (पर्यावरण स्नेही आधुनिक रोपवाटीका). माध्यमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण - भूषण अशोकराव पाटील (हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग), संजय गोपाळ साबळे (दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड), प्रकाश सटूप्पा बोकडे (बी. डी. विद्यालय, डुक्करवाडी). प्राथमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण - नबीसाब सीराज उस्ताद (विद्या मंदिर राजगोळी खुर्द), प्रशांत मारुती पाटील (मराठी विद्या मंदिर सरोळी), रेखा अशोक गायकवाड (केंद्र शाळा तुडये). प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर शैक्षणिक साधन - पी. एन. तरवाळ (जय प्रकाश विद्यालय, किणी), के. एस. गोसावी (मामासाहेव लाड विद्यालय, ढोलगरवाडी), एन. एम. कांबळे (हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग).
प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साधन - प्रशांत मारुती पाटील (विद्यामंदिर सरोळी), रंजीता विठ्ठल देसरकर (विद्यामंदिर वरगांव), सीमा दत्तात्रय नांदवडेकर (मराठी विद्या मंदिर मौजे कारवे), माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधन - डी. एस. विजें (जयप्रकाश विद्यालय, किणी), एस. ए. पाटील (जनता विद्यालय, तुर्केवाडी), पी. व्ही. ढेरे (भावेश्वरी विद्यालय, बसर्गे). प्रश्नमंजूषा स्पर्धेत - रामलिंग हायस्कूल, तुङये (प्रथम), श्रीराम विद्यालय, कोवाड (द्वितीय), हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग (तृतीय) यांनी अनुक्रमे यश संपादन केले. परिक्षक म्हणून एन. एम. मनगुतकर, पी. एम. टक्केकर, व्ही. जी. तुपारे, ए. एम. नार्वेकर, ए. एस. पाटील, एस. के. नार्वेकर, दयानंद होनगेकर, गुलाब पाटील, पी. वाय. पाटील, भूषण पाटील, मनोहर बोकडे, भरमाजी तुपारे, सुहास वर्पे, संजय तुपारे, पी. व्ही. ढेरे, नरेंद्र हिशेबकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
No comments:
Post a Comment