कोवाड येथे सोमवारी एक कोटी 43 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2018

कोवाड येथे सोमवारी एक कोटी 43 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

सौ. अनिता भोगण
सरपंच, कोवाड
कल्लाप्पा भोगण
जि. प. सदस्य

















कोवाड / प्रतिनिधी 
कोवाड (ता. चंदगड) येथे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत फंडातून १ कोटी ४३ लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ सोमवार (ता. २४) रोजी होत आहे. जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण यांच्या प्रयत्नातून गावच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच अनिता भोगण यांनी दिली. सकाळी ११ वाजता सरपंच भोगण यांच्या अध्यक्षस्थेखाली विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. 
जिल्हा परिषद फंडातून ३५ लाखाचा निधी मंजूर झालेल्या रस्मशान भूमीकडे जाणाच्या रस्त्याकडील साकवाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होईल. ग्रामपंचायत फंडातून ४८ लाखाचा निधी मंजूर झालेल्या मार्केट इमारतीचा पायाभरणी शुभारंभ आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषद फंडातून मराठी शाळा इमारत बांधकामासाठी २८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांच्या हस्ते होणार आहे. दलीत वस्तीतील पाण्याच्या टाकीचा बांधकाम शुभारंभ के. डी. सी. सी. बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सरकारी दवाखान्याच्या पाण्याच्या टाकीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण यांच्या हस्ते होणार आहे. गावांतर्गत रस्ते डांबरीकरण व क्रॉक्रीटीकरण कामांचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या विद्या पाटील, जोतिबा वांद्रे, अशोकराव देसाई, शिवाजी आडाव यांच्या हस्ते होईल. जन सुविधा केंद्राचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत व्हन्याळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, पंचायत समिती सदस्या नंदिनी पाटील, रुपा खांडेकर, एम. जे. पाटील,  एस. एन. राजगोळकर, सरपंच अरुण पाटील, शालन कांबळे, संजय पाटील, बी. डी. पाटील, दत्तू कडोलकर उपस्थित राहणार आहेत.


No comments:

Post a Comment