कोवाड (ता. चंदगड) येथे दिड कोटीच्या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक. शेजारी आमदार संध्यादेवी कुपेकर व इतर. समोर उपस्थित जनसमुदाय. |
कोवाड / प्रतिनिधी
कोल्हापूरच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला आहे. त्याला संसदरत्य पुरस्काराने सन्मानीत केले आहे. कोल्हापूरच्या विकाससाठी मनापासून काम केल्यामुळे 792 खासदारांच्यातून संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला. तरीही विरोधकांच्या पोटात याची कालवाकालव होवू लागल्याने ते गावोगावी आरोप करत सुटले आहेत. सत्तेची धमेंड असलेल्यांना कोल्हापूरची जनता लवकरच उतरवेल असे सुचक वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत फंडातून दीड कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ झाला. त्यावेळी आमदार कुपेकर बोलत होत्या. सरपंच अनिता भोगण अध्यक्षस्थानी होत्या.
खासदार पुढे म्हणाले, ``कलापा भोगण यांच्या प्रयत्नवादी दृष्टीकोणामुळे कोवाडमध्ये दीड कोटीचा विकास निधी आला. यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. युवकाना संधी दिली तर गावागावातून विकासाची गंगा येईल.' जिथं कोणी नाही,तिथं आम्ही आहोत ' या ध्यासाने कामे केल्याने ग्रामस्थांचा या विकास कामांत एकोपा दिसून आल्याचे सांगितले.`` आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, ``सत्ता, संपत्ती आणि त्यायोगे प्रतिष्ठा हे विषमता निर्मितीचे प्रमुख स्त्रोत असून ते विकासाकडे वाटचाल करणान्या गावाना मारक आहे. उपेक्षित घटकांना विकासाची समान संधी देऊन ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न हवेत. याच विचारातून जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी दीड कोटींचा विकास निधी आणल्याने कोवाड गावच्या विकासाला गती आली आहे.``
कल्लापा भोगण यांनी गावच्या विकास कामात मी कधीही कमी पडणार नाही, असे सांगून माझ्या घराण्याला राजकीय वारस नसून मी एका शेतकरी कुटुंबातून समाजिक कार्याची आवड असल्याने सक्रिय झाल्याचे सांगितले. स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकवाच्या कामाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला. मार्केट इमारत आमदार संध्यादेवी कुपेकर, मराठी शाळा इमारत बांधकामाचा शुभारंभ पाण्याची टाकी, रस्ता डांबरीकरण, कॉक्रीटीकरण यांचा शुभारंभ शिवाजी आडाव, रामराजे कुपेकर, विद्या पाटील, जोतिबा वांद्रे यांच्या हस्ते झाला. सरपंच अनिता भोगण यांनी स्वागत केले. उपसरपंच विष्णू आडाव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, विद्या पाटील, बी. डी. पाटील, नंदिनी पाटील, रुपा खांडेकर, शालन कांबळे, जोतिबा वांद्रे, मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, विलास पाटील उपस्थित होते. भैरू भोगण व पांडूरंग जाधव यांनी सुत्रसंचालन केले. संजय कुंभार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment