चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात भारत स्वच्छता अभियान मोहिमेच्या अंतर्गत परिसर स्वच्छता - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2018

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात भारत स्वच्छता अभियान मोहिमेच्या अंतर्गत परिसर स्वच्छता

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात भारत स्वच्छता अभियानांतर्गत एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता केली.

चंदगड / प्रतिनिधी
भारत स्वच्छता अभियान मोहिमेच्या अंतर्गत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसर स्वच्छता करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत मैदान दुरुस्ती, प्लास्टिक निर्मूलन, रोपांचे संगोपन व संवर्धन, कचरा मुक्ती, पाणी निचरा व जल साक्षरता संबंधी प्रबोधन करुन विविध कामे पार पाडण्यात आली. श्रमदान पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. ए. डी. कांबळे, ज्ञानेश्वर सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. कामाचे योग्य नियोजन करून संपन्न केले. यावेळी विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजनासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एन. एस. एस. प्रतिनिधी शिवाजी गावडे प्रतिनिधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment