चंदगड येथे परिट समाजाच्या वतीने गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी झाली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करताना समाजबांधव. |
चंदगड /
प्रतिनिधी
चंदगड
येथील रामलिंग मंदिर येथे चंदगड तालुका परीट समाजामार्फत श्री संत गाडगेबाबा
महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पंचायत समिती भुदरगड गारगोटीच्या
सभापती स्नेहल परीट अध्यक्षस्थानी होत्या.
प्रास्ताविक
माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट यांनी केले. सभापती स्नेहल परीट यांनी शिक्षण
महत्त्वाचे असून समाजाने त्यावर भर द्यावा असे व्यक्त केले. प्रमुख
वक्ते विठ्ठल महाराज फड यांनी ``देव
देवळात नसून माणसात आहे. त्याच्या स्वच्छतेबरोबर मनाची
स्वच्छता करणे महत्वाचे असल्याचे सांगून संत गाडगेबाबा महाराज यांचे विचार
प्रभावीपणे मांडले.`` प्रमुख
पाहुणे चंदगड ठाणे ठाण्याचे अमर सावेकर, महाराष्ट्र राज्य प्रदेश धोबी सेवा चंदगड
कागल उपाध्यक्ष सागर परीट, राधानगरी उपाध्यक्ष संभाजी सावेकर, श्रीमती यादव, हरिभाऊ
भालेकर यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनातील संघर्षाबाबत मार्गदर्शन केले.
अनिल जाधव यांनी समाजाने आपल्या हक्क व अधिकारासाठी उभा केलेल्या आंदोलनांमध्ये
सक्रिय सहभाग नोंदविण्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष बाबू धोंडीबा
परीट, ग्रा. पं. सदस्य दिलिप परीट, औंदुबर
लोळके, ओम परीट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजाभाऊ परीट, औंदुबर मोरे,
विनायक यादव, अवधुत यादव, सतीश परीट, रमेश यादव, शिवाजी परीट, अर्जुन परीट, संजय
परीट, मनोज परीट, पांडुरंग परीट, रवळनाथ परीट, परसू परीट, महादेव बांदेकर,
दत्तात्रय शिंदे, सुभाष पाटील, बाळकृष्ण लोळके, विठ्ठल पाटील यासह तालुक्यातील
बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. पंकज पाटील यांनी सुत्रसंचालन केले. संतोष
सुर्यवंशी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment