पार्ले येथील गव्याच्या हल्यातील जखमीला वनविभागाकडून एक लाखाचा धनादेश - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

पार्ले येथील गव्याच्या हल्यातील जखमीला वनविभागाकडून एक लाखाचा धनादेश

पाटणे (ता. चंदगड) येथील वनकार्यालयासमोर गव्याच्या हल्यात जखमी झालेले सुरेश फाटक यांना एक लाखाचा धनादेशाचे वाटप करताना वनविभागाचे अधिकारी. 

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पार्ले येथे गव्याच्या हल्यात जखमी झालेल्या सुरेश फाटक यांना वनखात्याकडून नुकसान भरपाई म्हणुन एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पाटणे येथील वनखात्याच्या कार्यालयात प्रदान करण्यात आला. या वेळी वनक्षेत्रपाल एम. एन. परब, वनपाल डी. जी. पाटील, ए. डी. शिंदे, एम. एन. धामणेकर, पार्ले सरपंच समृद्धी सुधाकर गावडे, सयुंक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण वसंतराव सोनार, पाटणे येथील वन खात्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment