बिजुर येथे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या फंडातून रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

बिजुर येथे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या फंडातून रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

बिजूर (ता. चंदगड) जिल्हा परिषद फंडातून रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करताना माजी रोहयो राज्यमंत्री  भरमूआ्ण्णा पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती विठाताई मुरकुटे व इतर ग्रामस्थ.
चंदगड / प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत पुंद्रा कडील बिजुर (ता. चंदगड) येथे जिल्हा परिषद फंडातुन जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नाने बिजुर ते भोगोली रस्ता डांबरीकरणासाठी ८४ लाख निधी मंजूर झाला आहे. या बिजुर ते भोगोली रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, पंचायत समिती सभापती बबन देसाई, उपसभापती विठाताई मुरकुटे, ग्रुप ग्रामपंचायत पुंद्राच्या सरपंच सरपंच सौ. आनंदी राजाराम आगलावे, उपसरपंच कृष्णा हरेर, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी रवळनाथ गावडे, गावचे जेष्ट नागरिक श्री. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तेजम, पोलिस पाटील अशोक तेजम, कानुर बुद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते सचिन आगलावे, विश्राम सुतार, शिवाजी गावडे, ग्रामसेवक पुंडलीक राऊत, दत्ताराम गोंडे, निवृत्ती गावडे,  आनदा तेजम, बापू मटकर, निवृत्ती चौकुळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शिक्षक, बिजुर, भोगोली, मासुरे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment