शेवाळे येथे सातेरी देवी व महारतळ मंदिर वास्तुशांती सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2018

शेवाळे येथे सातेरी देवी व महारतळ मंदिर वास्तुशांती सोहळा



चंदगड / प्रतिनिधी
शेवाळे (ता. चंदगड) येथे सातेरी देवी व महारतळ मंदिर वास्तुशांती मूर्ती स्थापना व कळस रोहन सोहळा संपन्न झाला. कळस रोहन मूर्ति स्थापना श्री श्री श्री ष. ब्र महर्षी धर्मश्री तपोरत्नं शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी मुक्ती मठ बेळगाव यांच्या उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना कळसारोहण कार्यक्रम आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार फंडातून आमदार कुपेकर यांनी सभामंडपासाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी विद्या पाटील, रूपा खांडेकर, भैरू खांडेकर, बी. डी. पाटील, गुणाजी शिंदे,  नामदेव गावडे, संतोष गावडे, शांताराम पाटील, गणपती गावडे, आत्माराम वांद्रे, महादेव पाटील व ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment