मातृ संस्थेचा सन्मान करणारे विद्यार्थी कर्तुत्ववान – प्राचार्य गुरबे, 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2018

मातृ संस्थेचा सन्मान करणारे विद्यार्थी कर्तुत्ववान – प्राचार्य गुरबे, 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा

कार्वे (ता. चंदगड) येथील 1987 च्या दहावीच्या बॅचचे स्नेहा मेळाव्यासाठी एकत्रित आलेले विद्यार्थी व त्यांचे गुरुजन.

मजरे कार्वे / प्रतिनिधी  
ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतले त्या मातृसंस्थेबद्दल मेळावा घेऊन त्या शाळेचा सन्मान करणारे विद्यार्थी हे खरे कर्तुत्ववान विद्यार्थी आहेत. याच शाळेत या बॅच च्या बहुतांशी विद्यार्थ्यांची मुलही शिक्षण घेत आहेत. या शाळेचे नाव  देशपातळीवर  पोहोचवत आहेत. हे या संस्थेचे खरे यश असल्याचे प्रतिपादन
महात्मा फुले विद्यालयाचे व गुरु. म. भ. तुपारे ज्यूनि. कॉलेजचे प्राचार्य एस. व्ही. गुरवे यांनी व्यक्त केले. म. फु. विद्यालयाच्या 1987 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थ्यी विद्यार्थी निवृत्ती हारकारे यांनी करून हा स्नेहमेळावा फक्त भेट घेऊन जाण्याचा नाही तर यापुढे या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एका कुटुंबाच्या  सदस्य सारखे संबंध प्रस्थापित करावेत असा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या काळातील गुरुजन वर्ग बी. व्ही. कागणकर, एस. बी. पाटील, प्रा. डी. डी. पाटील, प्रा. के. जी. शिरोडकर व शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र मालुसरे यांचा यावेळी सन्मान झाला. बी. व्ही. कागणकर म्हणाले, ``1987 ची बॅच म्हणजे विद्यालयाच्या वाटचालीत आदर्श आहे. या मेळाव्याची इतिहासात नोंद होईल.`` एस. बी. पाटील म्हणाले, `असा दुर्मिळ योगायोग घडविणे सोपे नाही. स्मृती पाठीमागे ठेवून जाणारी येथील ही पहिली बॅच आहे. खडतर प्रवास करून सगळे स्थिरस्थावर झाली आहेत.  अशाच मागील सर्व बॅचचा महा स्नेहमेळावा आयोजित करावा.``  यासाठी या बॅचच्या  विद्यार्थ्यांनी आघाडी घ्यावी, कारण शाळेच हीत यामध्ये जोपासल जाईल.``
          प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत कसं घडावं हे आम्ही शिकलो व अशा विद्यार्थ्यांना हेच शिकवलं असे मत प्रा. डी. डी. पाटील यांनी व्यक्त केले. दुःख हे आव्हान म्हणून स्वीकारायचं असतं, ज्या परिस्थितीतून आम्ही शिक्षण घेतलं,  विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आम्ही ठरवलं. त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केलेली त्यांची आठवण म्हणजेच शिक्षकांची गुरुदक्षिणा असे उद्गार प्रा. के. जी. शिरोडकर यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. जी. सी. गोडसे, नरेंद्र भांडारकर, रामचंद्र मालुसरे, डॉ. बाळकृष्ण पाटील, संजय तुपारे, रामचंद्र तुपट, प्रकाश हारकारे, ज्ञानोबा बोकडे, ईश्वर कांबळे, मारुती कलखांबकर, माया पाटील, उषा खोतसंध्‍या हेरवाडकर, अनिता परमहंस, सुरेखा पाटील, रिटा फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हनुमंत पाऊसकर यांनी केले तर आभार सदानंद गावडे यांनी मानले. 



No comments:

Post a Comment