चंदगड /
प्रतिनिधी
"महाराष्ट्रात शिवसेनेची तरूण भगवी सत्ता येणार.
निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी शिव- संवाद दौऱ्याच्या माध्यमातुन सपुंर्ण
महाराष्ट्र पिंजुन काढत आहे. तरूणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी शिवसेना कटीबध्द
असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शिनोळी (ता. चंदगड) येथे शिवसंवाद दौऱ्यानिमित्य
आयोजीत केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घघाटन प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी आदित्य ठाकरे यांचे स्वागत उपजिल्हाप्रमुख
प्रभाकर खाडेंकर यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी करून
महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर वसलेल्या चंदगड तालुक्यातील युवकांमध्ये शिवसेनेविषयी
प्रचंड उत्साह असुन या वेळेच्या विधानसभेला शिवसेनेचा आमदार विजयी होईल असे
सांगितले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, " २०१९ च्या विधानसभेत शिवसेनेची
सत्ता येणार आहे. ही सत्ता तरूणांची असेल. त्यासाठीच उद्याचा महाराष्ट्र
घडविण्यासाठी आत्तापासुनच तयारी सुरू आहे. यासाठीच शिव संवाद दौऱ्याचे आयोजन सुरू
आहे. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, तरूणांवर आज
आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. युवा सेनेच्या माध्यमातुन राज्यातील भगिंणीसाठी
स्वसंरक्षण प्रशिक्षण राबवणार असल्याचे सांगुन नवनिरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी
युवा सेनेची पाऊले पडत आहेत. त्यामुळे युवकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे
राहावे असे आवाहन केले.
प्रारंभी शिनोळी येथे चंदगड तालुका शिवसेनेच्या जनसंपर्क
कार्यालयाचे व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आदित्य
ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सपंर्क प्रमुख अरूणभाई दुधवाडकर, प्रा. संजय मंडलिक, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, संग्राम कुपेकर, सरपंच नम्रता पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश शिरोळकर, रंजना शिंत्रे, श्वेता नाईक, शांता जाधव, संज्योती मळवीकर, अनिल दळवी, अशोक मनवाडकर, अजित खाडेंकर अदिसह शिवसैनिक मोठया
सख्येंने उपस्थित होते. सुत्रसचांलन अखलक मुजावर यांनी तर आभार प्रताप उर्फ पिणु
पाटील यांनी मानले. या आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील 500 रूग्णांनी घेतला.
No comments:
Post a Comment