जंगमहट्टी येथे कै. व्ही. बी. पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2018

जंगमहट्टी येथे कै. व्ही. बी. पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे माजी आमदार कै. व्ही. बी. पाटील यांच्या स्मारक अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवर.

मजरे कार्वे / प्रतिनिधी
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे माजी आमदार स्वर्गीय व्ही. बी. पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी त्यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी चंदगड तालुक्याच्या विविध भागातून विविध मान्यवर उपस्थित होते.
       भूविकास बँकेचे माजी व्हाईस चेअरमन गोविंद पाटील म्हणाले, ``माजी आमदार स्वर्गीय व्ही. बी. पाटील हे सर्वार्थाने चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते होते. ॲडव्होकेट स्वर्गीय   व्ही. बी. पाटील  यांनी स्वतःच्या कुटुंबीयांची 55 एकर जमीन  जंगमहट्टी  प्रकल्पासाठी देऊन चंदगडचे न्यायालयाचे ते शिल्पकार होते. दौलत, आजरा साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. खेडूत शिक्षण संस्थेच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला होता.`` प्रास्ताविक निवृत्त शिक्षक डि. एल. तुप्पट यांनी केले. व्ही. बी. पाटील यांनी खेडूत शिक्षण संस्था निस्वार्थीपणे वाढविली. त्यांच्या आदर्श नुसार वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रकाश पाटील, संभाजीराव पाटील, सदानंद पाटील, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा. शिवाजीराव पाटील, डॉ. बाळकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, अश्विनी पाटील, आर. एम. गावडे, निवृत्ती गावडे, बाळू धामणेकर, तुकाराम भोसले, गोपाळ गावडे, मारुती नागुर्डेकर  यांच्यासह ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment