आर. टी. ओ. नी वेळेत उपस्थित राहण्याची नागरीकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2018

आर. टी. ओ. नी वेळेत उपस्थित राहण्याची नागरीकांची मागणी



चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील आर. टी. ओ. कॅम्प शनिवारी (ता. 15) चंदगड येथे ठेवण्यात आले होते. या कॅम्पला येणारे आर. टी. ओ. अधिकारी वेळेत उपस्थित न राहिल्याने लायसन्स काढण्यासाठी आलेल्या नागरीकांचा वाट बघण्यात बराच वेळ गेला. दुपारी आर. टी. ओ. अधिकारी कॅम्पच्या ठिकाणी आले. यावेळी चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचे पत्रकार अनिल धुपदाळे व चेतन शेरेगार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून उशिरा येण्याबाबतचे कारण समजून घेवून नागरीकांच्या मागणीनुसार दर महिन्याला वेळेत उपस्थित राहण्याबाबत सुचविले.
शनिवारी चंदगड येथील शासकीय विश्रामगृह येथे कॅम्प होते. प्रत्येक महिन्याला हे कॅम्प होत असते. यापूर्वी तालुक्यातील वाहन धारक, चालक आदींना लायसन्सच्या कामासाठी गडहिंग्लज अथवा कोल्हापूर येथे जावे लागत होते. याची दखल घेवून तत्कालीन आमदार कै. बाबासाहेब कुपेकर यांनी आपल्या प्रयत्नानी आर. टी. ओ कॅम्प चंदगडला आणून नागरीकांची सोय केली. हे कॅम्प त्यावेळेपासून चंदगड दर महिन्याला चंदगड येथे लायसन्स कॅम्प घेतले जाते. या कॅम्पला तालुक्यातुन अगदी दुरवरून लोक येतात. हे लोक आपले काम लवकर व्हावे यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत उभे होते. दुपारी उशिरापर्यंत आर. टी. ओ. आले नव्हते. वेळ निघून जाऊनही आर. टी. ओ. अधिकारी आले नसल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचे पत्रकार अनिल धुपदाळे व चेतन शेरेगार यांनी तात्काळ आर. टी. ओ अधिकारी यांची भेट घेवुन तालुक्यातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून आपण दर महिन्याच्या कॅम्पला कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, याबाबत आवर्जून सुचविले. काही कारणास्तव थोडा उशिरा झाला. मात्र यापुढे लोकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल असे आर. टी. ओ. अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment