कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना. |
चंदगड
प्रतिनिधी
शिवसेना
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आजच्या धावत्या दौऱ्यात कानडेवाडी (ता.
गडहिंग्लज) येथे संग्रामसिंह कुपेकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली व शिवसैनिकांशी
संवाद साधला. संग्रामसिंह कुपेकर यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
यावेळी
आदित्य ठाकरे यांनी ``महाराष्ट्र घडवण्यासाठी शिव संवाद
दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. राम
मंदिर केव्हा बांधणार? राष्ट्रपती, पंतप्रधान, सीबीआय, आर. बी. आय. गृहखातं सर्व
महत्वाची खाती एक हाती सत्ता असताना भाजप सरकार राम मंदिरचा मुद्दा करते आहे काय
असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राम मंदिर साठी शिवसेना ठाम आहे. निरोगी
महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्व तरुणांना एकत्र करून काम करणे गरजेचे असल्याचे
त्यांनी सांगितले. यावेळी अरुणभाई दुधवाडकर, आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक, वरून सरदेसाई, पवन जाधव, भैयासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, भरमाणा गावडा, बी. एम. पाटील, विजयराव देवणे, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, सौ. संज्योती मळवीकर, सौ. शांता जाधव यांच्यासह तालुक्यातील
शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment