निटटूर (ता. चंदगड) येथे आगीत जळालेली गवताची व्हळी. |
कोवाड / प्रतिनिधी
निटटूर (ता. चंदगड) येथे पाझर तलावाशेजारी
लमणमाळ शेतात शॉर्टसर्किट होऊन १३ गवताच्या व्हळ्या जळून खाक झाल्या. मंगळवारी
दुपारी बारा वाजता ही घटना घडली. आगीत आठ शेतकऱ्यांच्या व्हळ्या जळाल्याने लाखोंचे
नुकसान झाले आहे. तलाठी दीपक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
श्रीधर बाळाराम पाटील, मनोहर
गोपाळ पाटील, दत्ता इराप्पा पाटील, शंकर
सुबराव पाटील, भरमाना विठोबा नेसरकर, परसु
रामचंद्र नेसरकर, नरसु परसू पाटील व विठ्ठल हरी पाटील या
शेतकऱ्यांच्या व्हळ्या आगीत जळाल्याने चाऱ्याचा प्रश्न या शेतकऱ्यांच्यासमोर उभे
राहीला आहे. यातील दत्ता पाटील व मनोहर पाटील यांनी विकत घेतलेल्या ५ व्हळ्याही
जळाल्या. नरसु पाटील यांची झोपडी जळाल्याने शेती अवजारे जळून खाक झाली.
महिन्याभरापूर्वी या शेतकऱ्यांनी ओले गवत कापून वाळवून त्याच्या व्हळ्या (बनवी) रचल्या होत्या. वर्षभर जनावरांना चाऱ्याची सोय व्हावी
या उद्देशाने शेतकऱ्यांनी गवताची बेगमी करून ठेवली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी
अचानक व्हळ्याना शॉर्टसर्किटमुळे आग
लागली. आगीचा भडका जोरात उडाल्याने बघता बघता १३ व्हळ्यानी क्षणात पेट घेतला.
शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण एकमेकाला व्हळ्या लागून असल्याने यश
आले नाही. तसेच गवत वाळलेले असल्याने आगीचे लोट दूरवर पसरत गेले.त्यामुळे तासाभरात
सर्व गवत व्हळ्या जळून खाक झाल्या . सर्किटमुळे आग लागल्याचे जळीतग्रस्थ
शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याने महावितरणने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी
शेतकऱ्यांच्यातून मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment