हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या अपघातात कॉलिसच्या समोरील बाजुचा झालेला चक्काचुर. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
नेसरी-कोवाड रोडवर हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे कॉलीस
गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक पुंडलिक भरमू सुतार (रा. दुंडगे, ता.
चंदगड) हे गंभीर जखमी झाले. आज सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. यासंदर्भात घटनास्थळी मिळालेली माहीती अशी - नेसरीहून कोवाडकडे जात असताना हडलगेजवळील `शेडे कामत` नावाच्या शेतात
एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कॉलीस गाडी (क्र. एम. एच. 04, एडब्ल्यु 7192) बाजूच्या
झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोराची होती की कारची डावी बाजू चक्काचूर झाली. या
धडकेत गाडीच्या कॅरीयर वरील साहित्यासह कॅरीयर दुरवर फेकले गेले. जखमी पुंडलिक यांना
खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment