![]() |
बेळगुंदी साहित्य संमेलनात चायना कविता सादर करताना कवी जयवंत जाधव |
कोवाड / प्रतिनिधी
बेळगुंदी (ता. बेळगांव) येथील रवळनाथ पंचक्रोशी
साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनात कोवाड (ता.
चंदगड) येथील कवी जयवंत जाधव यांनी 'चायना
' कविता सादर केली. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली
संमेलन झाले. तिसऱ्या सत्रात भालचंद्र मयेकर (गोवा) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या
कवी संमेलनात श्री जाधव यांनी सादर केलेल्या 'चायना ' कवितेला
रसिकांनी भरभरून दाद दिली. यापूर्वीही जाधव यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात
कविता केली आहे. जाधव हे प्राथमिक शिक्षक असून त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध
झाले आहेत.
1 comment:
मस्तच
Post a Comment