कालकुंद्री येथे सरस्वती विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात `आघात` कथासंग्रहाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

कालकुंद्री येथे सरस्वती विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात `आघात` कथासंग्रहाचे प्रकाशन

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे सरस्वती विद्यालय स्नेहसंमेलन प्रसंगी के. जे. पाटील यांच्या `आघात` कथासंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर.

कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार जुनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी ॲड. एस. आर. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार तेजस्विनी मारुती पाटील, उद्योजक मारुती आप्पाजी कोकितकर,  डॉ. डी. एन. मिसाळे, माजी प्राचार्य भाऊराव काकतकर उपस्थित होते.
प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सी. बी. निर्मळकर यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्त कालकुद्री येथील प्राथमिक शिक्षक के. जे. पाटील यांच्या `आघात` या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. पाटील यांचे यापूर्वी लचका व तलप हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संगीता कोळी होत्या. उद्घाटन उद्योजक दिनकर दत्तात्रय पाटील यांनी केले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अशोक पाटील, सिनेकलाकार शिवाजीराव कोकितकर आदीं उपस्थित होते. रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. जिमखाना प्रमुख आर. व्ही. सावंत, प्रा. दयानंद तेऊरवाडकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख ई. एल. पाटील, ए. आर. गुरव यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment