किटवाड ग्रामस्थांचा विद्यार्थ्यांच्या कॉलेज बससाठी आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

किटवाड ग्रामस्थांचा विद्यार्थ्यांच्या कॉलेज बससाठी आंदोलनाचा इशारा



कोवाड / प्रतिनिधी

मलतवाडी ते किटवाड (ता. चंदगड) ही कॉलेज बस अचानक बंद केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे तात्काळ ही बस पूर्ववत सुरू करावी,  अन्यथा कोवाड येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किटवाड ग्रामस्थांनी आगार प्रमुखांना  दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता अचानक बस बंद केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी बस पूर्ववत पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. किटवाड, होसुर, कल्याणपुर,  कौलगे,  बुकिकहाळ, जक्कनहट्टी व मलतवाडी येथील विद्यार्थ्यांना कोवाड येथे कॉलेजला जाण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ही कॉलेज बस  सुरू केली आहे. बसमुळे या भागातील लोकांच्यासह  विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून बस अचानक रद्द केल्याने केल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. काही विद्यार्थी खासगी वाहनांचा आधार घेऊन कॉलेजला ये- जा करत आहेत.  त्यामुळे आगारप्रमुखांनी तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अन्यथा कोणतीही सूचना न देता कोवाड बाजारपेठेत आंदोलन करु असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



No comments:

Post a Comment