दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगड तालुका हा अनेक कलागुणांनी संपन्न अलेल्या लाेकांचा तालुका आहे. या तालुक्याला अनेक कलांबराेबर नाट्यकलेची माेठी परंपरा आहे. काेणतीही भाैतिक साधने उपलब्ध नसलेल्या काळात या तालुक्याने ही कला प्राणपणाने जपली होती. गावाेगावी शेतीची आणि इतर कष्टाची कामे करीत यात्रा आणि जत्रांमध्ये गावातीलच हरहुन्नरी कलाकार एकत्र येऊन नाटक करायची येथे परंपरा आहे. त्यातून प्रत्येक गावातील हौसी कलाकारांना नाटक ही कला समजून घेण्याची आणि अभिनय करायची संधी उपलब्ध हाेते.
परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये गावागावातून नाटक अस्तगंत हाेते आहे. यात्राजत्रातून नाटकांऐवजी चित्रपट कलापथके येऊ लागली. आता टीव्ही घराेघरी पोहोचल्यानंतर त्यातील गंमतही निघून गेली. पर्यायाने या भागातील एक महत्त्वाची कलाच नष्ट होत गेली. त्यासाठी ती पुन्हा पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने भाषाविकास संशोधन संस्था, हलकर्णी यावर्षीपासून नाट्यमहोत्सव आयोजित करीत आहे.
सदर नाट्य महोत्सव 1 फेब्रुवारी, 2019 ते 6फेब्रुवारी, 2019 या दरम्यान हलकर्णी फाटा येथील विवेक इग्लिश मेडिअम स्कुलच्या प्रांगणात अयाेजित करण्यात आला आहे. या नाट्य महाेत्सवात राज्य नाट्य स्पर्धेत यशस्वी झालेली सहा नाटके आयाेजित करण्यात आली आहेत. मुंबई येथील अभिनव नाट्य संस्थेचे गस्त, कोल्हापूरच्या कलापरिवर्तनचे ऱ्हासपर्व, कुडाळचे घोकंपट्टी डॉट कॉम, आजरा येथील अक्कड बक्कड, दर चंदगडचे हरहुन्नरी नाट्यकर्मी परसू गावडे यांनी दिग्दर्शन केलेली अशुद्ध बीजापोटी आणि विच्छा माझी पुरी करा अशी एकूण सहा नाटके या नाट्य महाेत्सवात सादर होतील. तरी सदर नाट्यमहोत्सवातील नाटकांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे अवाहन संयाेजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment