हलकर्णी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 2 व 3 फेब्रुवारीला - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2019

हलकर्णी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 2 व 3 फेब्रुवारीला


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड ) चे वार्षिक स्नेहसमेंलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सपंन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व प्रो कब्बड्डी यु मुबांचा सिध्दार्थ देसाई उपस्थित राहणार आहे. दौलत विश्वस्त सस्थेचें मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.शनिवार २ रोजी सकाळी ८.३०वा. दौलत विश्वस्त सस्थेचें अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन, फनी गेम्स,फुड फेस्टीवल, शेला पागोटे असे विविध कार्यक्रम या दिवशी सपंन्न होणार आहेत.   दि. ३ रोजी सकाळी १०:०० वा. विद्यार्थी गुणगौरव पारीतोषिक वितरण कार्यक्रम सपंन्न होणार आहे. दि. ४ रोजी सकाळी ८:३० वा. विवीध गुणदर्शन कार्यक्रम सपंन्न होणार आहे. ह्या सर्व कार्यक्रमासाठी अशोक जाधव,सस्थेचें सचिव विशाल पाटील, मनोहर होसुरकर अदि उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व आजी माजी विद्यार्थ्याणी उपस्थित राहण्याचे आवाहण प्राचार्य डॉ.पी.वाय. निबांळकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment